अमृततुल्य चहा काय आहे आणि अमृततुल्य चहा फ्रॅंचायझीचा फायदा
हिंदू पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून अमृत निर्माण झाले जे पिल्याने अमरत्व प्राप्त होते अशी आख्यायिका आहे. अशा अमृताच्या तुलनेचा चहा म्हणजेच अमृततुल्य चहा. आणि खरोखरच अमृततुल्य चहात अमृताचा गोडवा आहे, जो पिल्याने मन अगदी तृप्त होते.
1995 मध्ये सोलापूरला मी जेव्हा इंजिनियरिंगला शिकत होतो, त्यावेळी माझी पहिल्यांदा अमृततुल्य चहाशी ओळख झाली. त्यावेळी एका टपरीवजा जुनाट दुकानात अमृततुल्य चहा मिळत असे. त्या दुकानासमोरून जाताना चहाच्या सुगंधानेच चहा प्यायची इच्छा होत असे आणि पावले आपोआप दुकानात वळत असत. चहाची चव इतकी सुरेख की एका कपाने कधी मन भरत नसे. नुसती चवच नाही, अमृततुल्य चहा तयार होताना बघणे ही सुखावह गोष्ट असे.
साधारणतः अमृततुल्य चहा एका पितळेच्या पातेल्यात ग्राहकांसमोर बनवला जातो आणि जसजसे पातेले जुने होत जाते तसतसा त्यात बनणारा चहा अधिक चवदार बनत जातो अशी धारणा आहे. दूध आणि पाणी एकत्र उकळले जाते मग त्यात भरपूर साखर, मसाला (वेलची, आले किंवा सूंठ आणि इतर मसाल्यांचे मिश्रण ) आणि चहा पावडर टाकले जाते. यानंतर ते ओतू जाणार नाही याची खात्री करण्यासाठी सतत ढवळत राहतात.
अमृततुल्य चहाचा शोध कोणी आणि कुठे लावला याची खात्रीलायक माहिती कोणाकडेही नाही. परंतु बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की याचा उगम हा पुणे शहरात झाला असावा.
आतापर्यंत आपण अमृततुल्य चहाचा आस्वाद घेतलाच असेल. जर नाही तर एकदा हा चहा पिऊन बघाच. काही लोकांना अमृततुल्य चहा नाही आवडणार किंवा फार गोड वाटेल ही, पण गोडवा हीच या चहाची ओळख आहे आणि देशभर त्याची ख्याती आहे, लाखो लोक रोज हा चहा पितात.
काही वर्षांपूर्वीपर्यंत हा अमृत तुल्य चहा दुर्लक्षित होता, किंवा चहा विकण्याचा व्यवसाय करणे कमीपणाचे होते. पण आज आपण सर्वत्र कोणत्या ना कोणत्या ब्रँडचे अमृततुल्य चहाचे शॉप बघत असाल आणि त्यामुळे चहाच्या व्यवसायाला एक ग्लॅमर आले आहे. आज हजारो लोक या धंद्यात लाखोंचा फायदा कमावत आहेत आणि हजारो लोकांना रोजगार देत आहेत. आज अशा एका शॉपचे मालक असणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
मैत्री अमृततुल्य एक असा ब्रँड आहे जिथे अमृततुल्य चहा बनवायची पारंपारिक पद्धत, त्यासाठी लागणारी पितळेची पातेली वापरली जातात. आजच्या हाईफाई कॅफेच्या जमान्यात सुद्धा अगदी सिम्पल पण स्वच्छ असे आपले शॉप आणि आपल्या मैत्री अमृततुल्य चहाची चव, आपल्याला ९०च्या दशकात घेऊन जाते. चहाची किंमतही एवढी माफक आहे की सर्वसामान्य लोकांना दुकानात शिरताना खिसा तपासून शिरायची गरज नाही.
आजच्या काळात अमृततुल्य चहा फ्रॅंचायझी घेणे हे खूपच फायद्याचे आहे. बहुतेक फ्रँचायझी मालक लाखाहून अधिक रुपयांची कमाई करतात.
अमृततुल्य चहा फ्रॅंचायझीचे मालक होण्याचे फायदे
१. इतर सर्व व्यवसायांशी तुलना करता अगदी कमी गुंतवणूक
२. चहा गरज आहे त्यामुळे चहाच्या व्यवसायाला मरण नाही.
३. चहाचा व्यवसाय असल्याने इतर व्यवसायाप्रमाणे चढउतार नाहीत
४. सुमारे 35-40% नफा, जो इतर व्यवसायांपेक्षा जास्त आहे
५. किरकोळ विक्री असल्याने ग्राहकांकडून रोख रक्कम जमा होते
६. इतर व्यवसायाप्रमाणे खूप मालाचा साठा करून ठेवायची गरज नाही
७. दुकानात फक्त चहाचा माल असल्याने चोरी होण्याचे कारण नाही
मैत्री अमृततुल्यच का?
१. मैत्री अमृततुल्यची सर्व ग्राहकांना आवडेल अशी अद्वितीय चव
२. इतर सर्व अमृततुल्य चहा फ्रँचायझीच्या तुलनेत अगदी कमी गुंतवणूक
३. स्वच्छ व्यवहार. कोणतीही लपवलेली किंमत नाही.
४. फ्रॅंचायझी मालकांना पूर्ण सपोर्ट
५. गुणवत्तेत कोणतीही तडजोड नाही
आणखी बरेच फायदे आहेत, अधिक माहितीसाठी आमच्या फ्रँचाईझ पेज ला भेट द्या.